30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयरशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला १० दिवसांत मंजूरी मिळणार

रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला १० दिवसांत मंजूरी मिळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेने कहर माजविण्यास सुरुवात केली आहे. रविवारी तर तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित आढळले आहे. दुसरीकडे देशात कोरोनाप्रतिबंधक लसींचा तुटवडाही भासत असल्याचे चित्र आहे. मात्र अशात आनंदाची बाब म्हणजे भारतात १० दिवसांत रशियाच्या स्फुटनिक व्ही या लसीला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर ऑक्टोबरच्या प्रारंभापासून ७ लसी उपलब्ध होतील, अशीही माहिती मिळत आहे.

कोरोना लसींची मुबलकता वाढावी, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे समजते आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानूसार येत्या १० दिवसांतच रशियाच्या स्फुटनिक व्ही या लसीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मात्र ती भारतात जुनपासून उपलब्ध होणार आहे. स्फुटनिक व्हीच्या उत्पादनासाठी रशियन डायरेक्­ट इनवेस्­टमेंट फंडने भारतातील अनेक औषध उत्पादक कंपन्यांबरोबर उत्पादन करार केले आहेत. भारतात या लसीचे दरवर्षी ८५ कोटी डोस तयार केले जातील, असे समजते आहे. त्याशिवाय भारत व अन्य देशातील ५ लसींनाही ऑक्टोबरपर्यंत मंजूरी मिळणार आहे.

कोणत्या लसींची शक्यता
स्­पुटनिक व्ही, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, नोवावॅक्स, भारत बायोटेकची नाकातून द्यावयाची लस, जायडस कॅडिला आदी ५ लसी लवकरच भारतात उपलब्ध होणार आहेत.

टीआरपी घोटाळ्यात वाझेंनी घेतली ३० लाखांची लाच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या