22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयसचिन पायलट दिल्लीत

सचिन पायलट दिल्लीत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली असून, पक्षनेतृत्वाकडून राज्यातील प्रश्नांवर तोडगा काढण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही, असे सचिन पायलट गटाचे म्हणणे आहे़

राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाºया जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्यातच सचिन पायलट यांनी नेतृत्वाकडे आपल्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

पक्षातूनच राजस्थानात निर्माण झालेल्या राजकीय पेचावर तोडगा काढण्याचा दबाव पक्षनेतृत्वार तयार केला जात आहे़ शनिवार आणि रविवारी सचिन पायलट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे. सचिन पायलट काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे अशोक गेहलोत गटाचीही पायलट गटावर नजर आहे.

प्रदेशाध्यक्ष सिंहसुध्दा दिल्लीत हजर
सचिन पायलट यांच्या पाठोपाठ शनिवारी सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटसरा हेदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. डोटसरादेखील अजय माकन यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

काँग्रेस सत्तेत आल्­यास कलम ३७० लागू करू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या