24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्राइमसाकेत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पत्नीसह आत्महत्या

साकेत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पत्नीसह आत्महत्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली न्यायालयातील न्यायाधीश आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश दक्षिण दिल्लीतील साकेत न्यायालयाशी संबंधित होते.

साकेत न्यायालयाचे न्यायाधीश अशोक बेनिवाल आणि त्यांच्या पत्नीने काही कारणामुळे आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी ते छतरपूर येथे भावाच्या घरी गेले होते, अशीही माहिती मिळाली आहे. या दाम्पत्याने त्यांच्या घरीच आत्महत्या केल्याचे बोलले जातेय. ही आत्महत्या कशी झाली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

अशोक बेनिवाल यांच्या कुळात अनेक न्यायाधीश
प्राथमिक माहितीनुसार, पत्नीसह आपला जीव गमावलेले अशोक कुमार यांचा एक भाऊ आणि बहिणीही न्यायाधीश आहेत. न्यायाधीश अशोक बेनिवाल यांचे काका जे. पी. नारायण हेही साकेत न्यायालयात न्यायाधीश राहिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या