22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीयमहिलांसाठी सखी निवास

महिलांसाठी सखी निवास

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शिक्षण, नोकरी, नोकरीसंबंधी प्रशिक्षण किंवा संशोधनासाठी सर्रास मुली किंवा महिलांना आपले घर सोडून अन्यत्र जावे लागते. अशा एकट्या मुली किंवा महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने भाडेतत्त्वावर ५० नवे हॉस्टेल उभारण्याची घोषणा केली आहे.

या हॉस्टेलचे नाव सखी निवास असेल. या ठिकाणी केवळ महिलांनाच नाही, तर त्यांच्या मुलांनादेखील राहण्यास मुभा दिली जाणार आहे. आईसोबत १८ वर्षांपर्यंत मुली, १२ वर्षांपर्यंत मुले राहू शकणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या