30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीय‘मेड इन पीआरसी’च्या नावाखाली चिनी उत्पादनांची भारतात विक्री

‘मेड इन पीआरसी’च्या नावाखाली चिनी उत्पादनांची भारतात विक्री

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान घाटीमध्ये चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात चीनचे ४० हून अधिक सैनिक मारले गेले होते. या चीनच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या वृत्तीमुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट आहे. यामुळे बायकॉट चायनाची मोहिम तीव्र झाली असून सरकारनेही चिनी कंपन्यांवर बंदी, कंत्राटे रद्द करण्याची कारवाई केली आहे. यामुळे ‘मेड इन चायना’ची उत्पादने खरेदी करणे भारतीय टाळू लागले आहेत. यावर काही कंपन्यांनी मोठी शक्कल लढविली आहे.

कंपन्या भारतीयांच्या भावनांशी खेळू लागल्या
स्वत:ला भारतीय म्हणवणा-या आणि हेडफोन आदी बनविणा-या कंपनीने भारतीयांसोबत घोर फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. चीनमधून ज्या वस्तू आयात केल्या जातात त्यावर मेड इन चायना असे लिहिलेले असते. आता तिथे मेड इन पीआरसी लिहिले जात आहे. अशाप्रकारे या कंपन्या भारतीयांच्या भावनांशी खेळू लागल्या आहेत.

मेड इन पीआरसी म्हणजे काय?
तुम्हाला आठवत असेल मेड इन युएसए असे अनेक उत्पादनांवर लिहिलेले असायचे. परंतू ते अमेरिकेचे नसून उल्हासनगर असायचे. असाच काहीसा भ्रम या कंपन्या ग्राहकांमध्ये उत्पन्न करू लागल्या आहेत. पीआरसी म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना होय. मेड इन चायना लिहिण्याची वेगळी पद्धत आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकल्याने या कंपन्यांनी मेड इन पीआरसी लिहिण्यास सुरुवात केली आहे.

सरकार कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाबाबत आग्रही; प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या