22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयमीठ समजून खाल्ले उंदीर मारण्याचे औषध

मीठ समजून खाल्ले उंदीर मारण्याचे औषध

एकमत ऑनलाईन

भोपाळ : दारूच्या नशेत एखादा व्यक्ती कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. दारूच्या नशेत दारूड्याने अनेक करामती केलेल्या आपण ऐकल्या असतील पण मध्य प्रदेशमध्ये एकाने दारूच्या नशेत कहरच केला आहे. त्याने पिताना चक्क उंदीर मारण्याची पावडर खाल्ल्याचे समोर आले आहे.

सदर युवक दारू पीत असताना सैंधव मीठ म्हणून उंदीर मारण्याचे औषध चाटत होता. नंतर त्याच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

घटनेसंदर्भात अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील रामगढ येथे ही घटना घडली आहे. तेथील पुष्पैंद्र रैंकवार या तरुणाला दारूचे व्यसन आहे. त्याच्या मित्रांनी सांगितले की तो दारू पीत असताना सोबत मीठ आणि सॅलड खात होता.

त्यावेळी त्याने उंदीर मारण्याचे औषध मीठ म्हणून त्यामध्ये मिसळले आणि चाटू लागला. प्रत्येक पेगसोबत तो सैंधव मीठ म्हणून औषध चाटत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले आहे.

त्यानंतर त्याला त्रास होऊ लागला आणि उलट्या होऊ लागल्या. या घटनेनंतर त्याला त्याच्या मित्रांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याने उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याचे समोर आले असून यापुढे सदर युवकाने परत कधीच दारू न पिण्याचे ठरवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या