21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयप्रत्येक साधुंची समाधी अशक्य : खा.साक्षी महाराज

प्रत्येक साधुंची समाधी अशक्य : खा.साक्षी महाराज

एकमत ऑनलाईन

पाटणा : देशात जवळपास २ ते २़५ कोटी साधू आहेत. जर आम्ही सगळ्यांसाठी समाधी बनविण्याचे ठरवले तर किती जागा लागेल याची कल्पना करता येऊ शकते. देशात २० कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. जर प्रत्येकाला दफन केले गेले तर यासाठी जमिन कुठून मिळणार असे साक्षी महाराज म्हणाले.

उत्तर प्रदेशातील गावांमध्ये अल्पसंख्यांक लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिमांना दफनभूमीची जागा दिली पाहिजे. ज्या गावात मुस्लिम संख्या कमी आहे तिथे मोठ्या दफनभूमी असणे हे अन्यायकारक आहे असे विधान भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील बंगरमऊ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार श्रीकांत कटियार यांच्या समर्थनार्थ उन्नाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना साक्षी महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे.

पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. दफनभूमी आणि स्मशानभूमीचे प्रमाण हे एक सारखे असणे आवश्यक आहे. एखाद्या गावात एक मुसलमान असला तरी तेथे मोठी दफनभूमी असते. हा अन्याय नाही का? असा सवाल साक्षी महाराज यांनी केला आहे.

म्हणून माझा छळ करण्यात आला – सीबीआयचे माजी संचालक आर. के. राघवन यांचा खुलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या