28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयसमलैंगिक संबंध, लिव्ह इन रिलेशनशीप हे कौटुंबिक संबंधच : सर्वोच्च न्यायालय

समलैंगिक संबंध, लिव्ह इन रिलेशनशीप हे कौटुंबिक संबंधच : सर्वोच्च न्यायालय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : परिवार, कुटुंब म्हणजे काय याची व्याख्या तुम्ही कशी कराल? सर्वोच्च न्यायालयाने याबाबत महत्त्वाचं मत नोंदवलं आहे. समलैंगिक संबंध, लिव्ह इन रिलेशनशीप हेही कौटुंबिक संबंधच आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने हे मत नोंदवलं आहे.

एका नर्सने प्रसूती रजा मागितली होती. मात्र तिचा हा अधिकार नाकारण्यात आल्यानं तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान खंडपीठाने स्पष्ट केलं आहे की, कायदा आणि समाजात कुटुंब म्हणजे एक आई आणि एक वडील आणि त्यांची मुलं, असंच मानलं गेलं आहे. पण अनेक कुटुंब या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांची उपेक्षा होते. त्यामुळे कुटुंबाची मूळ संकल्पना बदलण्याची गरज आहे. लिव्ह इन रिलेशनशीप, समलैंगिक संबंध हेही कौटुंबिक संबंधच आहेत.

याचिकाकर्त्या महिलेनं एका विधुर पुरुषासोबत लग्न केलं होतं. त्याला पहिल्या बायकोपासून दोन मुलं होती. बायकोच्या मृत्यूनंतर त्यानं दुसरं लग्न केलं. मात्र त्या महिलेचं हे पहिलंच लग्न होतं. त्यामुळे पतीला पूर्वविवाहातून दोन मुलं आहेत म्हणून या महिलेच्या प्रसूतीचा वैधानिक अधिकार नाकारला जाऊ शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या