21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयवीरप्पन टोळीविरुध्द कारवाई करणा-या संजय अरोरांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

वीरप्पन टोळीविरुध्द कारवाई करणा-या संजय अरोरांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संजय अरोरा हे आता दिल्लीचे नवे पोलिस आयुक्त असणार आहेत. ते राकेश अस्थाना यांची जागा घेतील. १९८८ च्या बॅचचे तामिळनाडू केडरचे कढर संजय अरोरा हे आयटीबीपीचे महासंचालक देखील राहिले आहेत. संजय अरोरा यांनी १९९७ ते २००० या काळात उत्तराखंडमधील मातली इथं आयटीबीपीच्या बटालियनचे नेतृत्व केले आहे.

आयपीएस संजय अरोरा यांनी मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जयपूर (राजस्थान) येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली होती. आयपीएस झाल्यानंतर, त्यांनी तामिळनाडू पोलिसांत विविध पदांवर काम केले. ते विशेष टास्क फोर्सचे पोलिस अधीक्षक (एसपी) होते. जिथं त्यांनी वीरप्पन टोळीविरुद्ध महत्त्वपूर्ण यश मिळवले. शौर्याबद्दल अरोरांना मुख्यमंत्री शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे.

१९९१ मध्ये संजय अरोरा यांनी एनएसजीमधून प्रशिक्षण घेतले. यानंतर, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या विशेष सुरक्षा गटाच्या (एसएसजी) निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वास्तविक, त्या काळात एलटीटीईच्या कारवाया शिगेला होत्या. अशा परिस्थितीत त्यांनी तामिळनाडूच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणूनही पदभार स्वीकारला. निमलष्करी दलात प्रतिनियुक्तीवर, कमांडंट पदावर आलेल्या काही आयपीएसपैकी संजय अरोरा हे एक आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या