26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयसरबजीत सिंगच्या पत्नीचा अपघातात मृत्यू

सरबजीत सिंगच्या पत्नीचा अपघातात मृत्यू

एकमत ऑनलाईन

भिखीविंद : २०१३ मध्ये पाकिस्तानच्या तुरुंगात जीव गमावलेला भारतीय नागरिक सरबजीत सिंगच्या पत्नीचा सोमवारी मृत्यू झाला. सुखप्रीत या दुचाकीवरून जात असताना फतेहपूरनजीक अचानक तोल जाऊन कोसळल्या. त्यांना त्वरित रग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिथे त्यांचे निधन झाले. सुखप्रीत यांच्यावर तरणतारण येथील भिखीविंद इथे आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांच्या पश्चात पूनम आणि स्वप्नदीप कौर अशा दोन मुली आहेत. तर, सरबजीत सिंग यांची बहीण दलबीर कौर यांचे छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर जूनमध्ये निधन झाले होते. दलबीर कौरने आपला भाऊ सरबजीत सिंगला पाकच्या तुरुंगातून सोडवण्यासाठी दीर्घ लढा दिला. सरबजीत सिंगचा(४९) एप्रिल २०१३ मध्ये लाहोर तुरुंगातील कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या