रांची : झारखंड राज्यातील सहा जिल्ह्यांमधील १५ शाळांमध्ये शिष्यवृत्तीसंदर्भात करण्यात आलेल्या एका पडताळणीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २०१९-२० मध्ये केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारे मंजुरी मिळालेल्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीबाबत ३० पेक्षा अधिक लाभार्थी विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण खुलासा केला आहे. यात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.
रांचीच्या हुतूप येथील गॉड चर्च शाळेत ९ वीच्या वर्गात शिकणा-या जिक्रूल अन्सारी या विद्यार्थ्याने सांगितले की, त्यांला मे महिन्यांत २,७०० रुपये शिष्यवृत्ती मिळाली, जी प्रत्येक वर्षी मिळणा-या ५,७०० रुपयांपेक्षा निम्म्याने कमी आहे. या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिष्यवृत्तीबाबत अधिका-यांकडे चौकशी केली असता, त्यांनी धक्कादायक उत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही देखील कठोर मेहनत केली आहे, त्यामुळे आम्हाला पण पैसे मिळण्याचा अधिकार आहे. माझे वडील लिफ्ट चालवतात त्यांच्या ८००० रुपये पगारात गुजराण करणे कठीण होते. पण आम्हाला माहिती नव्हते की जिक्रुलला ५७०० रुपये शिष्यवृत्ती मिळते.
रामगढमधील ब्लू बेल्स शाळेत १७९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली गेली. यांपैकी १७६ विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, शाळेत कोणतेही वसतिगृह नाही. धनबाद येथील डुमरामधील डेफोडिल्स पब्लिक स्कूलच्या रजिस्टरनुसार, २२४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती स्विकारण्यात आली. यांपैकी २२२ विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्याचे दाखवण्यात आले. या शाळेतही कोणतेही वसतिगृह नाही. इथं पहिली ते आठवीपर्यंत १००० विद्यार्थी आहेत. लाभार्थ्यांमध्ये १२५ किमी दूर हजारीबागमध्ये राहणा-या नईमा खातून यांचाही समावेश आहे.
वसतिगृह नसताना शिष्यवृत्ती मंजूर
रोकॉर्डनुसार, १५७ विद्यार्थी ज्यांपैकी ७२ मुली आहेत, त्यांना ही स्कॉलरशिप मंजूर करण्यात आली. या शाळेत विद्यार्थींनीसाठीचे वसतिगृह नाही. शाळा चालवणा-या मौलाना रिजवी यांनी सांगितले की, सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी एजंट्सच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरले होते. माझे काम होते की ते माझ्या शाळेत शिकतात की नाही याची पडताळणी करणे. पण या प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वसतिगृहाच्या नावाखाली फसवणूक
घुघरीच्या लॉर्ड शाळेमधील रेकॉर्डनुसार शाळेत ३२४ विद्यार्थ्यांपैकी कमीत कमी २१३ विद्यार्थी असे आहेत़ ज्यांना १०,७९९ रुपये मिळाले आहेत. या शाळेच्या इमारतीत मैदानाच्या मध्यभागी केवळ पाच खोल्या आहेत. शाळेचे मालक संजय गोप म्हणाले, २०० मुंलांकडून आम्हाला याबाबत निवेदन आले. यामध्ये बनावट असू शकतात. यामध्ये काहीतरी अवैध झाले आहे मात्र हे कसे झाले याची माहिती नाही.
कपडे शिवणा-याच्या पत्नीला बनवले विद्यार्थी
रांचीचा मदरसा आलिया अरबमध्ये १०२ विद्यार्थ्यांना १०,७०० रुपयांची शिष्यवृत्तमी मिळाली. त्यामध्ये ४७ वर्षीय रजिया खातून यांचा समावेश आहे. रजिया यांनी सांगितले की, एका एजंटने आम्हालाा सांगतले होते, की तुम्हाला १०,७०० रुपये मिळतील. मला हे माहिती नव्हते की हा पैसा शाळेच्या मुलांसाठीचा असेल.
बिहार सरकार डबल इंजिन नव्हे तर धोक्याचे सरकार