22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयमंगळुरूच्या मलाली मशीद परिसरात कलम १४४ लागू

मंगळुरूच्या मलाली मशीद परिसरात कलम १४४ लागू

एकमत ऑनलाईन

मंगळुरू : कर्नाटकातील मंगळुरू येथील प्रसिद्ध मलाली जुमा मशिदीच्या आसपासच्या परिसरात स्थानिक प्रशासनाने गुरुवारपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. २४ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २६ मे च्या सकाळपर्यंत परिसरातील मशिदीच्या ५०० मीटर परिसरात हा प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे.

जुमा मशीद परिसरात गर्दी जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळुरू प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. यासोबतच परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, मलाली येथील श्री रामांजनेय भजन मंदिरात विहिंप आणि बजरंग दलाने ‘तांबूल प्राशन’ केले. २१ एप्रिल रोजी मंगळुरूच्या बाहेरील जुन्या जुमा मशिदीमध्ये हिंदू मंदिरासारखी वास्तुशिल्पं सापडली होती. मशिदीच्या जीर्णोद्धाराच्या वेळी मंदिरासारखे पुरावे सापडल्याचे सांगण्यात आले आहे. हे नूतनीकरण मशीद कमिटीकडून करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या