21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयजम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला सापडली ५ किलो स्फोटके

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला सापडली ५ किलो स्फोटके

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू काश्मीर – कुपवाडा येथील गुलगाम परिसरात सुरक्षा दलाने सर्च आॅपरेशन करून ५ किलो स्फोटके, २ डेटोनेटर्स आणि २ पोस्टर्स हस्तगत केली आहेत. त्यामुळे पुढे होणार घातपात टळला आहे. सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला देखील केला आहे. ही घटना श्रीनगरच्या हवल सजगीरपोरा परिसरात घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी आणि नागरिक जखमी आहे.

पोलिस कर्मचारी आणि नागरिकाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि पोलिस कर्मचारी यांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाने या परिसराला घेरले असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. सुरक्षा दल आणि पोलिस यांना एकत्र दहशतवाद्यांनी यावेळी टार्गेट केले आणि हल्ला केला. जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला करून लक्ष्य केले. फारूख अहमद असे जखमी झालेल्या पोलिस जवानाचे नाव आहे तर दुसरा नागरिक असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे सर्च आॅपरेशन अजूनही सुरु आहे.

साधेपणाने होणार बायडन शपथ सोहळा ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या