श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी सुरू आहे. प्रशासनाने या शस्त्रसंधीचा वापर नागरिकांची सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यासाठी केला. याअंतर्गत पुंछ जिल्ह्यात एलओसीनजीकच्या भागांत १३ हजारांहून जास्त गोळीबार प्रतिबंधक खंदकांची निर्मिती केली आहे. या बँकर्सचा वापर पाकिस्तानच्या गोळीबारादरम्यान केला जाईल. सुरुवातीस पाकिस्तान लष्कराकडून होणा-या गोळीबारामुळे शेंिलग प्रूफ बंकर्सचे बांधकाम हळूहळू होत होते. मात्र, शस्त्रसंधीनंतर त्याला वेग आला आहे.
पुंछ सर्वात जास्त गोळीबार प्रभावित क्षेत्रांपैकी एक आहे. एका अधिका-याने सांगितले की, एलओसीजवळच्या भागांत १५ हजार बंकर बनवण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश बंकर्सचे बांधकाम केले आहे. उर्वरित बंकर्स लवकरच तयार केले जातील. बंकर्सचे डिझाइन अशा पद्धतीने केले आहे की ते पाकिस्तानच्या गोळीबाराचा सामना करू शकतील. सामुदायिक बंकरमध्ये राहू शकतील ५० नागरिक बंकर दोन प्रकारचे आहेत. प्रत्येक कुटुंबासाठी फॅमिली बंकर आहे आणि दुसरे मोठे सामूदायिक बंकर आहे, जिथे गोळीबारादरम्यान अनेक कुटुंब सोबत राहू शकतील. फॅमिली बंकरमध्ये ८-१० लोक राहू शकतील.
शस्त्रसंधीआधी गेले ४६ लोकांचे प्राण
२५ फेब्रुवारी २०२१ पासून लागू झाली. तेव्हा भारतीय व पाकिस्तान लष्कर संवेदनशील नियंत्रण रेषेवर तणाव कमी करणे आणि शांतता कायम राखण्यावर सहमत झाले. त्याआधी २०२० मध्ये एलओसीवर ५,१३३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. त्यात ४६ लोकांचा मृत्यू झाला. २८ जानेवारी, २०२१ पर्यंत एलओसीवर पाकने २९९ वेळा शस्त्रसंधी मोडली होती. २०१९ मध्ये ३४७९ शस्त्रसंधी तोडली. १२ लोक ठार १९ जवान शहीद झाले.