24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयआत्मनिर्भर भारत चा चीनला दणका

आत्मनिर्भर भारत चा चीनला दणका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत मोहिमेची सुरुवात केली होती. मोहिमेला यश मिळताना दिसू लागले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांमध्ये चीनसोबत होणा-या व्यापारातील तुटीमध्ये तब्बल निम्म्याने घट झाली आहे.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट महिन्यादरम्यानची व्यापारी तूट ही गतवर्षीच्या याच काळातील तुटीच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे. चीनमध्ये निर्यातीत वाढ आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत उचललेल्या पावलांमुळे आयातीमध्ये झालेली घट हे यामागील मुख्य कारण आहे. देशात चीनविरोधी वातावरण तयार झाल्यापासून सरकारने चीनकडून होणा-या आयातीवर अनेक प्रकारचे निर्बंध घातले आहेत. तसेच चीनमधून होणा-या मालाच्या डम्पिंगला प्रतिबंध घालण्यासाठी डम्पिंग शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट २०२० दरम्यान भारत आणि चीन यांच्यातील व्यापारामधील तूट १२.६ अब्ज डॉलर (सुमारे ९३ हजार कोटी रुपये) एवढी राहिली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात याच काळात ही तूट २२.६ अब्ज डॉलर एवढी होती. त्यापूर्वी म्हणजे २०१८-१९ या आर्थिक वर्षात ही तूट १३.५ अब्ज डॉलर एवढी होती. व्यापार तुटीमध्ये मोठ्या घटीमागे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यातील वाढता तणावही कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. भारतीयांनी याकाळात देशभक्तीच्या मुद्द्यावर चीनी मालाचा वापर कमी केल्याचेही दिसून आले आहे.

चीनमधून होणारी आयात कमी करण्याबरोबरच चीनमध्ये होणारी निर्यात वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. ऑगस्टमध्ये सलग चौथ्या महिन्यात चीनमध्ये होणा-या निर्यातीमध्ये दोन आकडी वाढ झाली आहे. ही वाढ मुख्यत्वेकरून लोह आणि स्टीलच्या निर्यातीमधून झाली आहे. या काळात चीनमध्ये होणा-या लोह आणि स्टिलच्या निर्यातीमध्ये सुमारे आठ टक्क्यांनी वाढ झाली. त्याशिवाय इतर क्षेत्रातूनही निर्यात वाढल्याने एकुणच एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये चीनमध्ये होणा-या निर्यातीत तब्बल २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी याच काळात भारतातून चीनमध्ये होणारी निर्यात ही केवळ ९.५ टक्क्यांनी वाढली होती.

आयएसआयला माहिती पुरवणा-याला नाशिकमध्ये अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या