22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून माहिती दिली.

‘जड अंतःकरणाने माझे वडील अहमद पटेल यांचे निधन झाल्याची घोषणा करावी लागत आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३० वाजता आपल्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांना करोनाचे निदान झाले होते. उपचारादरम्यान त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी सगळ्यांना आवाहन करतो की, गर्दी ठिकाणी जाणे टाळून करोना नियमांचे पालन करा. नेहमी सोशल डिस्टन्सिगचे पालन करा, असे फैजल पटेल यांनी म्हंटले आहे.

गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेसचे ‘चाणक्य’ पर्यंतचा प्रवास
अहमद पटेल यांचा जन्मा गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरमध्ये झाला. 1977 मध्ये त्यांनी आपली पहिली लोकसभा निवडणूक लढली आणि जवळपास 62 हजार मतांनी ते विजयी झाले. 1980 मध्ये त्यांनी 82 हजार मतांनी विजय मिळवला. तर 1984च्या निवडणुकीत त्यांचा तब्बल 1 लाख 23 हजार मतांनी विजय झाला. पुढे 1993 पासून अहमद पटेल राज्यसभेचे खासदार राहिले.

1977 ते 1982 दरम्यान पटेल यांनी गुजरात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तर 1983 ते 1984 असं एक वर्ष त्यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं जॉईंट सेक्रेटरी पद सांभाळलं. पुढे 1985 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान पटेल माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव राहिले. जानेवारी 1986 मध्ये त्यांच्यावर गुजरात काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 1991 मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर पटेल यांना काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य बनवण्यात आलं.

1996 मध्ये त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं कोषाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. पण काही कारणांमुळे त्यांनी ते पद सोडलं. पुढे 2000 साली सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून पटेल यांनी कारकिर्द गाजवली. संघटनेसोबतच पटेल यांनी नागरी उड्डाण मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे बनवण्यात आलेल्या कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

अहमद भाईंनी आयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली; त्यांच्या आत्म्याला शांती लाभो; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे कि ‘अहमद पटेल यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले. त्यांनी सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्ष समाजाची सेवा केली. त्यांनी आपल्या बुद्धीचार्तुयाने राजकीय जिवनामध्ये यश संपदान केले. त्यांनी काँग्रेस पक्षाची मजबूत पायाभरणी करण्यात त्यांची भूमिका ही कायम लक्षात राहणारी आहे. त्याचा मुलगा फैसल याच्याशी संवाद साधला असून सात्वंन केले आहे. अहमद पटेल यांच्या आत्माला शांती लाभो’

काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ हरपला, राहुल गांधी हळहळले
राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘हा एक दु: खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. पक्षाच्या सर्वात कठीण काळात ते पक्षासोबत उभे होते, त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. फैजल, मुमताज आणि पटेल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत’.

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या