इटावा : एक धक्कादायक बातमी आहे. समाजात काय चालले आहे ते खुप भयंकर आहे. दारूच्या नशेत आपण काय करतोय याचे भानही कुणाला राहू नये हे फार गंभीर आहे. एका 80 वर्षांच्या वृद्धेवर एका तरुणाने बलात्कार केल्याची भयंकर घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार इटावा येथे ही घटना घडली. येथे राहणाऱ्या एका वृद्धेच्या घरात 26 जूनच्या रात्री हा आरोपी शिरला. दारूच्या नशेत तर्र असलेल्या या नराधमाने त्या वृद्धेवर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. सोनू उर्फ सुरजीत प्रेम सिंह असं या नराधमाचं नाव आहे.
सोनूवर भारतीय दंड विधानाचे कलम 261/20, 452 तसंच 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू हा बुडैल्ला नावाच्या गावचा रहिवासी आहे. तो महिलेच्या गावी का आला होता, तसंच त्याच्या हातून अन्य काही गुन्हे घडले आहेत का, याचा तपास सुरू आहे.
Read More औरंगाबादेत आज 208 रुग्णांची वाढ; कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4974 वर