नवी दिल्ली : मोदी सरकारने सलग सातव्या वर्षी देशाच्या संरक्षण खर्चात वाढ केली आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी संरक्षण क्षेत्रासाठी ४.७८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ ७ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. ४.७८ लाख कोटीच्या तरतुदींमधील १.३५ लाख कोटी रुपये शस्त्रास्त्र खरेदीसाठी राखून ठेवण्यात येतील.
मागीलवर्षी ही रक्कम १.१३ लाख कोटी रुपये इतकी होती. यंदा त्यात १९ टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात चीन व पाकिस्तानकडून वाढलेल्या आगळीकीच्या पार्श्वभुमीवर आपणही प्रत्युत्तराची तयारी करीत असल्याचा इशाराच केंद्रसरकारकडून देण्यात आला आहे. यंदा महसूली खर्चासाठी २.१२ लाख कोटी रुपये तर पेन्शनसाठी १.१५ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
एलआयसी, आयडीबीआयसह विविध कंपन्यांचे खाजगीकरण