22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयराहूल गांधींच्या भारत जोडोवर आता शहांचा हल्लाबोल

राहूल गांधींच्या भारत जोडोवर आता शहांचा हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत असा हल्लाबोल गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजपने जोरदार शाब्दीक हल्ले सुरू केले आहेत. राहूल गांधी यांनी एका ख्रिस्ती धर्मप्रसारकाची भेट घेण्यावरून भाजपने जोरदार टीका केली आहे. आता खुद्द शहा हेच मैदानात उतरले आहेत.

राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर भाजपचा दिल्लीच्या अशोका रस्त्यावरूनही कार्यरत होणारा आय टी सेल विलक्षण सक्रिय झाला आहे. राहूल गांधी यांचा कथित विदेशी टी शर्ट, ते मुक्काम करणार असलेला कंटेनर व त्यातील सुविधा, वादग्रस्त धर्मप्रसारक जॉर्ज पोन्नय्या यांची राहूल यांनी घेतलेली भेट आदी गोष्टी हुडकून हुडकून भाजप रोज या यात्रेवर टीकास्त्र सोडत आहे.

शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले की राहुल बाबा नुकतेच भारत जोडो यात्रेसाठी निघाले आहेत. राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत ! राहुल बाबा आणि काँग्रेसजनांना त्यांच्या संसदेतील भाषणाची मी आठवण करून देतो. राहुल बाबा तेव्हा म्हणाले होते की भारत हे राष्ट्र नाही. अहो राहुल बाबा, कुठली पुस्तके वाचलीत? मॉं भारती हे ते राष्ट्र आहे ज्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले आहे.

भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी भारत जोडो यात्रेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ही यात्रा म्हणजे वास्तवात एक द्वेषपूर्ण मोहीम असल्याचे म्हटले की आज काँग्रेसने जॉर्ज पोनय्या यांना भारत जोडो यात्रेचा पोस्टर बॉय बनवले आहे. हा तोच माणूस आहे जो हिंदूंना धमक्या देतो आणि भारतमाते बद्दल अपमानास्पद शब्द बोलतो. शहजाद पूनावाला म्हणाले, काँग्रेस पक्षाला हिंदूविरोधी असल्याचा मोठा इतिहास आहे. राहुल गांधी ‘हेट पेअर’ प्रचारात गुंतले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी धर्मगुरू पोन्नय्या यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याशी चर्चा करताना राहुल गांधींच्या व्हायरल झालेल्या व्हीडीओवर पक्ष प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की राहुल गांधींच्या पक्ष आणि भारत जोडो यात्रेदरम्यान नवरात्रीच्या आधी मा शक्ती, मॉ. भवानीचा अपमान करणारा व्हीडीओ समोर आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या