29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयशाहीन बागचे आंदोलन भाजपने रचलेला कट! आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

शाहीन बागचे आंदोलन भाजपने रचलेला कट! आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : नागरिकत्व सुधारणा (सीएए) कायद्याविरोधात नवी दिल्ली येथील शाहीन बाग परिसरात झालेलं आंदोलन हे भाजपाने रचलेला कट होता अशी घणाघाती टीका आम आदमी पक्षाने केली आहे. सीएए कायद्याला विरोध करत दिल्ली आणि नजिकच्या परिसरातील मुस्लीम नागरिकांनी शाहीन बाग येथे ३ महिने धरणं आंदोलनं केली. मात्र याच आंदोलनातील काही चेहरे भारतीय जनता पार्टीत सहभागी झाल्यानंतर सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना आम आदमी पक्षाचे प्रवक्ता सौरभ भारद्वाज यांनी भाजपावर निवडणुकीत मतांसाठी शाहीन बागचं आंदोलन घडवून आणल्याचा आरोप केला.

शाहीन बागचं आंदोलन सुरु असताना आम आदमी पक्षाने यापासून स्वत:ला वेगळं ठेवलं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांपासून इतर नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी एका कार्यक्रमात आम्ही शाहीन बागच्या लोकांसोबत आहोत असं म्हटलं होतं. भाजपामधील सर्वोच्च नेत्यांनी शाहीन बाग आंदोलनात काय-काय होईल हा सर्व कट रचला होता. कोण काय बोलेल, कोण कोणावर हल्ला करेल, त्याला प्रत्युत्तर कसं दिलं जाईल या सर्व गोष्टी आधीपासूनच ठरवल्या गेल्या होत्या, भारद्वाज यांनी भाजपावर टीका केली. शाहीन बाग परिसरातील महिला वर्गही या आंदोलनात सहभागी झाला होता.

पीएम केअर्समधील रक्कम एनडीआरएफला निधी हस्तांतरित करण्याची याचिका फेटाळली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या