22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयअशा राजकारणाची लाज वाटते

अशा राजकारणाची लाज वाटते

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करतात. आज राहुल यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर हल्लाबोल करताना देशात करण्यात येत असलेल्या राजकारणावरून टीका केली. यावेळी राहुल गांधी यांनी बिलकीस बानो प्रकरणातील आरोपांच्या सुटकेवरून भाजपवर निशाणा साधला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. तसेच सरकारवर गंभीर आरोप केले. राहुल गांधींनी ट्विट करून म्हटले की, की उन्नाव-भाजप आमदाराला वाचवण्यासाठी काम करा, कठुआ-बलात्का-यांच्या समर्थनार्थ रॅली, हाथरस – सरकार बलात्का-यांच्या बाजूने आणि आता गुजरात – बलात्का-यांची सुटका आणि सन्मान! गुन्हेगारांना पाठिशी घालणे हे भाजपची महिलांप्रती असलेली क्षुद्र मानसिकता दर्शवते. अशा राजकारणाची लाज वाटत नाही पंतप्रधान? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

बिल्कीस बानो प्रकरणात राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काल एक ट्विट देखील केले होते, ज्यामध्ये असे लिहिले होते की ज्यांनी ५ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या ३ वर्षांच्या मुलीची हत्या केली, त्या आरोपांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान मुक्त करण्यात आले. स्त्रीशक्तीच्या गप्पा मारणारे लोक देशातील महिलांना काय संदेश देत आहेत? पंतप्रधान, तुमच्या बोलण्यातील आणि वागण्यातील फरक संपूर्ण देशाला दिसत आहे असेही राहुल यांनी म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या