27 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयशंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

एकमत ऑनलाईन

इंदूर : द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील नरंिसगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक नेते मानले जात होते.

स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज हे करोडो सनातन ंिहदूंच्या श्रद्धेचे आधारस्तंभ होते. जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूरजवळील दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात होता. वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मप्रवास सुरू केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या