21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयशरद पवार-नितीन गडकरींची दिल्लीत भेट

शरद पवार-नितीन गडकरींची दिल्लीत भेट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे सतत स्थगित होत आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून पेगॅसस प्रकरणाच्या मुद्यांवरून सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, याआधी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. सहकार क्षेत्रातील प्रश्नांशी संबंधित यावेळी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले होते़ यानंतर आता शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे.

शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यातील ही भेट पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या सांगण्यावरून झाल्याचेही वृत्त आहे. या भेटीमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही नेत्यांमध्ये संसदेत सुरू असलेल्या गोंधळाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोंधळामुळे कामकाजात व्यत्यय येत असून, अनेक महत्त्वाच्या मुद्यांवरील चर्चा झाली नसल्याबद्दल याआधी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरच यातून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांची भेट गडकरींनी घेतली असल्याचे समजते. पावसाळी अधिवेश सुरु होऊन एक आठवड्याहून अधिक काळ झाला आहे.

विरोधकांचा गदारोळ
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पेगॅसस हेरगिरी प्रकरणासह इतर मुद्यांवरून विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळे प्रश्नोत्तर, शून्य प्रहराच्या तासाबरोबरच इतर कामकाजही स्थगित झाले. पेगॅसस आणि कृषी कायद्याच्या मुद्यांवरून विरोधक आक्रमक झालेत. दररोज याच मुद्द्यावरुन संसदेत गोंधळ घातला जात आहे. त्यामुळे अनेकवेळा अधिवेशन स्थगित करण्यात आले.

पेगॅसस हेरगिरी; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या