20.8 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रमल्टिप्लेक्­स कंपन्यांचे शेअर वधारले

मल्टिप्लेक्­स कंपन्यांचे शेअर वधारले

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र सरकारने चित्रपटगृह २२ ऑक्­टोबरपासून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्­स कंपन्यांचे शेअर सोमवारी वाढले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे पुरेशी काळजी घेऊन सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर आयोनॅक्­स लेजर या कंपनीचा शेअर आठ टक्­क्­यांनी वाढला. पीव्हीआर या कंपनीच्या शेअरच्या भावात पाच टक्­क्­यांची वाढ झाल्याचे दिसून आले.

सिनेमागृह आणि नाट्यगृह नेमकी कशा पद्धतीने चालू ठेवायची या संदर्भात मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारकडून लवकरच जारी केल्या जाणार आहेत. त्या सूचनांच्या चौकटीतच कामकाज केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण देशातील चित्रपट व नाट्यगृहाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. मात्र आता करोनाची तिसरी लाट येण्याची शक्­यता कमी आहे. त्याचबरोबर लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे हळूहळू सर्व सेवा सुरू करण्यात येत आहेत.त्याचाच भाग म्हणून चित्रपटगृह व नाट्यगृह सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या