22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयशर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

शर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

एकमत ऑनलाईन

दिसपूर : आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी सोमवार दि़ १० मे रोजी आसामच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यांच्यासोबत १३ कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. रविवारी आसाम भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेते म्हणून शर्मा यांची निवड झाली. त्यानंतर हेमंत बिस्वा शर्मा यांनी रविवारी राजभवन येथे राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. राज्यपालांनी सरमा यांचा दावा स्वीकारला व त्यांना सरकार स्थापण करण्यासाठी आमंत्रण दिले.

आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग, नागालँडचे मुख्यमंत्री नीपीयू रिओ उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल हेदेखील उपस्थित होते. मंत्रीमंडळात आसाम भाजपाचे प्रमुख रंजीत कुमार दास, असाम गढ़ परिषद (एजीपी) प्रमुख अरमुखतुल बोरा, यूपीपीएल नेता यूजी ब्रह्मा, भाजपा नेते परिमल शुक्लबैद्य, भाजपा नेते चंद्र मोहन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त केशब महंता, रंगोज पेगू, संजय किशन, जोगेन मोहन अजंता नियोंग, अशोक सिंघल, पीयूष हजारिका, बिमल बोरा यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

२० दिवसात १८ प्राध्यापकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या