24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयकॉंग्रेस अध्यक्षपदी शशी थरूर? सोनिया गांधींची घेतली भेट

कॉंग्रेस अध्यक्षपदी शशी थरूर? सोनिया गांधींची घेतली भेट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे अनेक राज्यांनी राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाचे अध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे, तर दुसरीकडे पक्षात मोठे बदल करण्यासाठी चालवल्या जात असलेल्या मोहिमेचे पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी समर्थन केले आहे. यादरम्यान थरूर यांनी सोनिया गांधी यांनी भेटीसाठी बोलवले होते.

आज थरूर आणि सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली आणि यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याकरीता शशी थरूर यांना सोनिया गांधींकडून हिरवा कंदील मिळाला असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशी थरूर यांना पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास सोनिया गांधींकडून मंजुरी मिळाली आहे. तसेच, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, जर त्यांची (शशी थरूर) इच्छा असेल तर ते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. कोणीही निवडणूक लढवू शकतो.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास मंजुरी दिल्याने ते निवडणूक लढवू शकतात. तसेच, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही निवडणुकीत दावा करू शकतात, असे देखील बोलले जात आहे.

१८ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार
काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख तारीख ८ ऑक्टोबर आहे. १७ ऑक्टोबरला निवडणुका होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या