26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयशशी थरुर यांनी पाठिंबा देणा-यांची यादी केली शेअर

शशी थरुर यांनी पाठिंबा देणा-यांची यादी केली शेअर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन दोन गट समोरासमोर आलेले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यावेळी खर्गेंसोबत ३० हून अधिक वरिष्ठ नेत्यांचे समर्थन होते. पण आता शशी थरूर यांनीही आपल्यासोबत असलेल्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांची यादी शेअर केलेली आहे.

येत्या १७ ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचा पुढील अध्यक्ष नॉन गांधी असणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं या निवडीकडे लक्ष लागलेले आहे. सध्या मैदानात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरुर हे आहेत. काँग्रेस मुख्यालयात उमेदवारी दाखल करताना आपल्याकडे ३० लोकांचा पाठिंबा असल्याचे मल्लिकार्जून खर्गे यांनी जाहीर केले होते. परंतु आता शशी शरूर यांनी १२ राज्यांतील ६० वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा असल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले आहे. त्यांनी पाठिंबा देणारे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

शशी थरूर यांना पाठिंबा देणा-यांमध्ये कीर्ती चिदंबरम् यांचाही समावेश आहे. कालच शशी थरुर यांनी बोलताना सांगितले की, ज्यांना पक्षाच्या कामकाजावर समाधान आहे त्यांनी खर्गे यांना समर्थन द्यावे. परंतु ज्यांना बदल अपेक्षित आहे त्यांनी माझी निवड करावी. के. एन. त्रिपाठी यांचा अर्ज फेटाळल्यानंतर आता खर्गे आणि थरुर यांच्यात लढत होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या