24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरच्या पोलिस पदकांवरून शेख अब्दुल्लांचे छायाचित्र हटवले

जम्मू-काश्मीरच्या पोलिस पदकांवरून शेख अब्दुल्लांचे छायाचित्र हटवले

एकमत ऑनलाईन

जम्मू : केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जम्मू-कश्मीरच्या सरकारी पदकांवरून शेख अब्दुल्ला यांचे छायाचित्र हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यापुढे मेडलवर अशोक स्तंभाचे मानचित्र लावण्याचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.

शेख अब्दुल्ला हे नॅशनल काँग्रेसचे संस्थापक आणि जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री होते. फारूख अब्दुल्ला हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पोलिस पदकांवर त्यांचे मानचित्र लावण्याचे आदेश दिले होते. त्यावर ‘शेर-ए-कश्मीर’ शेख मोहम्मद अब्दुल्ला असा उल्लेख असायचा.
केंद्रीय गृह विभागाचे प्रधान सचिव आर. के. गोयल यांच्या आदेशानंतर जम्मू-काश्मीर पोलिस पदक योजनेच्या परिच्छेद ४ मध्ये दुरुस्ती केली गेली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या