कानपूर : कानपूर हिंसाचाराचा कट लखनौत शिजला होता. हिंसा भडकवण्यासाठी येथील एव्हीपी-२४ नामक यूट्यूब चॅनलचा वापर करण्यात आला.
हिंसा भडकल्यानंतर ४ मुख्य आरोपी याच चॅनलच्या कार्यालयात दबा धरून बसले होते. कानपूर पोलिसांनी काल या चौघांच्या मुसक्या आवळल्या. कानपूर दंगलीचा मुख्य आरोपी हयात जफर हाश्मी आपला सहकारी जावेद अहमद खान याच्या माध्यमातून एव्हीपी-२४ न्यूज चॅनलच्या संपर्कात आला होता. तेथे हा कट शिजला.