25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयशिंदे गटाला मिळणार आता केंद्रात मंत्रिपद?

शिंदे गटाला मिळणार आता केंद्रात मंत्रिपद?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बंडखोरीनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ गळ््यात पडल्यानंतर आता शिंदे गटाला आणखी एक लॉटरी लागण्याची शक्यता आहे. त्यात केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. राज्यात नुकताच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यात शिंदे गटाकडून ९ आणि भाजपकडून ९ अशा १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता शिंदे गटाला केंद्रातही कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे तर या पदासाठी प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

शिवसेनाच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर सेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी शिंदे गटाची साथ पकडली. त्यांच्या या भूमिकेनंतर याबाबतची चर्चा सुरू होती. या भूमिकेसाठी नेमके काय बक्षीस दिल्े जाईल आणि मंत्रिपद दिले जाईल का, त्यात नुकतीच नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरसुद्धा एनडीएचा सर्वात मोठा घटक पक्ष शिंदे गट उरला असून, त्यांचे १२ खासदार आहेत. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे गटाला एखादे मंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद किंवा राष्ट्रीय पातळीवर एखाद्या कमिटीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या