24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home राष्ट्रीय शिवसेना स्वत:हून रालोआ तून बाहेर पडली - अमित शाह

शिवसेना स्वत:हून रालोआ तून बाहेर पडली – अमित शाह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रालोआमधून शिवसेना किंवा अकाली दल हे स्वत:च्या मनाने बाहेर पडले. आम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला नाही,असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते, त्यावेळी शाह यांनी असे प्रतिपादन केले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेनंतर भाजपा व शिवसेना या दोन्ही माजी मित्रपक्षारंमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रोज दोन्ही बाजुंनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्रे सोडली जात आहेत. त्या पार्श्वभुमीवर अमित शाह यांना काही पत्रकारांनी शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर अमित शाह म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही, शिवसेना असो की अकाली दल आम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. एनडीएमधून हे दोन्ही पक्ष स्वत:च बाहेर पडले आहेत. त्याला आम्ही काय करु शकतो?

मागील वर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपा यांची युती संपुष्टात आली. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवणा-या भाजपाला शिवसेनेने साथ सोडल्यामुळे विरोधात बसावे लागले. त्याआधी जेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेची सत्ता होती तेव्हाही सातत्याने भाजपावर टीका करण्याचे काम शिवसेनेने केले होते. भाजपाची साथ सोडल्यानंतर तर शिवसेनेने आणखी प्रखर टीका करण्यास सुरुवात केली.

सध्याच्या घडीला मंदिरे उघडण्याचा मुद्दा असो किंवा इतर मुद्दे यावरुन भाजपाने शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर शिवसेनाही भाजपाविरोधात खुलेपणाने बोलते आहे. संजय राऊत यांचे अग्रलेख, सुशांत सिंह प्रकरण, कंगनाची वक्तव्ये या सगळ्या वादांमधून भाजपा आणि शिवसेना यांच्या त आरोपांच्या फैरी वारंवार झडत आहेत. दुसरीकडे कृषि विधेयकांचा मुद्दा पुढे करुन अकाली दलानेही भाजपाची साथ सोडली आहे. हे दोन्ही प्रारंभापासूनच भाजपाबरोबर असलेले पक्ष रालोआतून बाहेर पडल्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चा माध्यमांमध्ये होत आहेत

हिमायतनगर शहरात दीड लाखाचा अवैध गुटखा जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या