26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातमध्ये काँग्रेसला धक्का

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का

एकमत ऑनलाईन

भरुच : गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या सात नेत्यांनी भरूचमध्ये पक्षाला राजीनामा दिला आहे. राजीनामा देणा-यांमध्ये भरूच शहर काँग्रेस अध्यक्ष विक्की सोखी, राज्य युवा महासचिव निकुल मिस्त्री, भरूच शहर उपाध्यक्ष किरण चव्हाण, कोषाध्यक्ष किरण परमार, जिल्हा युवक काँग्रेसचे नेते राधे पटेल आणि पक्षाचे कार्यकर्ते किशोर सिंह आणि राकेश गोहिल यांचा समावेश आहे. यासाठी सर्व नेत्यांनी गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांना जबाबदार धरले आहे.

विक्की सोखी म्हणाले की आम्ही गेली २५ वर्ष काँग्रेससोबत आहोत आणि सर्वजण कठीण परिस्थितीत पक्षाशी जोडले गेले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणा-या भरूचमधील काँग्रेस नेत्यांना आम्ही नावांची यादी पाठवली आहे. मात्र, जगदीश ठाकोर आणि नेत्यांनी कोणतेही पाऊल उचललेले नाही. कोणतीच कारवाई का नाही केली? असा प्रश्न आम्ही पुन्हा विचारला असता ज्यांना पक्षात रहायचे आहे ते राहू शकतात आणि ज्यांना सोडायचे आहे ते जाऊ शकतात असे उत्तर प्रदेशाध्यक्षांनी दिले. आम्हाला अशा प्रकारच्या उत्तराची अपेक्षा नव्हती म्हणून आम्ही आज पक्षाला राजीनामा दिला. राजकारणात यापुढेही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या