26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयधक्कादायक! २०० रुपयांच्या वर्गणीसाठी आदिवासी कुटुंबांवर बहिष्कार

धक्कादायक! २०० रुपयांच्या वर्गणीसाठी आदिवासी कुटुंबांवर बहिष्कार

मध्यप्रदेशमधील घटना ; सामाजिक बहिष्काराची अन्यायकारक घटना

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील गोंड आदिवासी समाजातील १४ परिवारांना दुर्गा पुजेसाठी २०० रुपयांची वर्गणी न दिल्यामुळे दोन आठवड्यांसाठी बहिष्काराला सामोरे जावे लागले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या परिवारांनी १०० रुपये वर्गणी देण्याची तयारी दाखवली होती, परंतू ती मान्य न करता या १४ ही कुटुंबांवर बहिष्कार घालण्यात आला.

१४ ऑक्टोबर रोजी लामटा गावात स्थानिक दुर्गा पुजा संस्थेने एक बैठक घेतली. गावातील १७० कुटुंबांनी प्रत्येक घरामागे २०० रुपये वर्गणी काढण्याचे ठरले. गावात ४० परिवार हे गोंड आदिवासी समाजाचे आहेत. यातील बहुतांश लोक मजुरी करतात. यापैकी काही कुटुंबांनी पुजेसाठी २०० रुपये वर्गणी देणे शक्य नसल्याचे सांगितले. परंतू गावकºयांच्या दबावामुळे २६ परिवारांनी वर्गणीचे पैसे देण्यासाठी होकार दिला. उर्वरित १४ कुटुंबांनी २०० ऐवजी १०० रुपये वर्गणी म्हणून देण्याची तयारी दाखवली. परंतू स्थानिक मंडळाने ही मागणी अमान्य केली.

दोन आठवडे बहिष्काराचा निर्णय
दुर्गा पुजा पार पडल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी गावात पुन्हा एकदा बैठक झाली. यात पंचायतीने पुजेसाठी वर्गणी न दिलेल्या १४ कुटुंबांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. या परिवारांना दोन आठवडे रेशन दुकानावर धान्य घेण्यासाठी, गावात कोणतही काम देण्यासाठी मज्जाव करण्यात आला.

पोलिसांत तक्रारही निष्फळ
दोन आठवडे हा बहिष्कार सुरु राहिल्यानंतर गावातील कुटुंबांनी गोंड समाज महासंघाकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतरही गावक-यांसोबतची चर्चा निष्फळ झाली.

जिल्हाधिका-यांकडून तंबीनंतर वठणीवर
अखेरीस गावक-यांनी बालाघाटचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्याकडे धाव घेतली. जिल्हाधिकारी दीपक आर्य यांना ही गोष्ट समजताच त्यांनी गावात जाऊन गावक-यांसोबत बैठक घेतली. कोणत्याही कुटुंबावर बहिष्कार घातला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिल्यानंतर या कुटुंबावरील बहिष्कार उठवण्यात आला आहे.

मेक इन इंडियानंतरही उत्पादन क्षेत्रात घरघर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या