27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयधक्कादायक : मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून दिव्यांग महिलेला मारहाण

धक्कादायक : मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून दिव्यांग महिलेला मारहाण

एकमत ऑनलाईन

आंध्र प्रदेश : जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच मृतांचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे. तर जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून कोटीहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अनेक देश कोरोनाशी सामाना करत आहेत. त्याचप्रमाणे या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय देखील केले जात आहेत. त्याचप्रमाणे या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र, आपल्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मास्क लावण्याचा सल्ला देणे एका दिव्यांग महिलेला महागात पडले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मास्क लावणे अनिर्वाय करण्यात आले असून मास्क न लावल्यास दंड आकारण्यात येत आहे. याच दरम्यान आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून एका दिव्यांग महिलेला केसाला धरुन बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; दिव्यांग महिलेने मास्क घालण्याचा सल्ला दिल्याने ही मारहाण करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यात यापूर्वीही वाद झाल्याचे समोर आले आहे.

Read More  नागपुरातील रस्त्यावर धावणार आता ४० इलेक्ट्रिक बस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या