कोलकाता : कोलकाता येथील बांग्लादेश उच्चायुक्तालयाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने गोळीबार केला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून, घटनेनंतर पोलीस कर्मचा-याने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली आहे. पोलीस कर्मचा-याने दोन ते तीन वेळा गोळीबार केला. परंतु, त्याचा नेम चुकला त्यानंतर त्याने महिलेला लक्ष््य केले अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. दरम्यान, पोलीस कर्मचारी अचानक बाहेर आला आणि त्याने गोळीबार सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
गोळीबारात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस कर्मचा-याने स्वत:वरही गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, हा पोलीस कर्मचारी कोण होता आणि त्याने अशा प्रकारचे कृत्य का केले हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. त्याशिवाय पोलीस कर्मचा-याच्या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचीही ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, केंद्रीय गृह मंत्रालयानेही या प्रकरणाची दखल घेत पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे.