23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयहवेत मारा करणा-या ‘शॉर्ट रेंज’ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

हवेत मारा करणा-या ‘शॉर्ट रेंज’ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि ‘डीआरडीओ’ने शुक्रवारी आपल्या संरक्षण क्षमतेला आणखी बळ देण्यासाठी जमीनीवरून हवेत मारा करणा-या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. यामुळे भारताची ताकद वाढली आहे.

या (व्हीएल-एसआरएसएएम) क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चांदीपूर किनारपट्टीवरून एका युद्धनौकेवरून करण्यात आली, अशी माहिती डीआरडीओच्या अधिका-यांनी दिली.

क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाचा मुख्य उद्देश भारतीय नौदलाच्या युद्धनौका तैनात करणे हा आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या तीन विभागांनी संयुक्तपणे या क्षेपणास्त्राची रचना आणि विकास केला आहे. या क्षेपणास्त्रामध्ये समुद्रातील स्किमिंग लक्ष््यांसह जवळच्या अंतरावरील विविध हवाई धोक्यांना नष्ट करण्याची क्षमता आहे.

४० ते ५० किमी आणि सुमारे १५ किमीच्या उंचीवर हाय-स्पीड हवाई लक्ष््यांवर मारा करण्यासाठी या क्षेपणास्त्राची रचना करण्यात आली आहे. याची रचना अ‍ॅस्ट्रा क्षेपणास्त्रावर आधारित आहे. जी व्हिज्युअल रेंजच्या पलीकडे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, असे डीआरडीओच्या अधिका-यांनी सांगितले.

याशिवाय या क्षेपणास्त्राची दोन ठळक वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे क्रूसीफॉर्म विंग्स आणि थ्रस्ट वेक्टरिंग. क्रूसीफॉर्ममधील पंख चारही बाजूंनी क्रॉससारखे मांडलेले चार लहान आकारातील पंख आहेत. यामुळे स्थिरता मिळण्यास मदत होते. तर, थ्रस्ट व्हेक्टरिंग इंजिनमधून कोनीय वेग आणि क्षेपणास्त्र नियंत्रित करणा-या थ्रस्टची दिशा बदलण्यास मदत करण्याचे काम करते.

गेल्या मे महिन्यात स्वदेशी बनावटीच्या नौदल अँटी-शिप क्षेपणास्त्राची चाचणी ‘डीआरडीओ’तर्फे करण्यात आली होती. त्यानंतर ‘डीआरडीओ’ने प्रथमच स्वदेशी बनावटीच्या नौदल अँटी-शिप क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या