22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीयखासदारांचा गोंधळ; जनतेचे १०५ कोटी पाण्यात!

खासदारांचा गोंधळ; जनतेचे १०५ कोटी पाण्यात!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महागाई व जीएसटीसारख्या मुद्यांवरून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळाचे केंद्र दुसरा आठवडा संपता संपता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अपमानापर्यंत येऊन स्थिरावले आणि आज दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच सोमवारपर्यंत (ता. १ ऑगस्ट) तहकूब करण्यात आले.

संसद अधिवेशन चालविण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या खिशातून ताशी लाखो रूपये जातात. या गोंधळाचेही खापर सरकार व विरोधी पक्ष एकमेकांवर फोडून स्वत: नामानिराळे राहण्याचा जो प्रयत्न करतात त्यामुळेही सामान्यांच्या मनात संताप उसळताना दिसतो.

दर वर्षी संसदेची तीन अधिवेशने होतात. या काळात एका मिनिटाच्या कारवाईसाठी तब्बल किमान अडीच लाख रूपये खर्च येतो. म्हणजेच एका तासाचे संसदीय कामकाज चालवायला दीड कोटी रूपये लागतात. गोंधळामुळे आजच्याप्रमाणे दिवसभराचे कामकाज तहकूब करावे लागले तर कोट्यवधींचे जे नुकसान होते ते पहाता गेल्या १० दिवसांत जनतेचे किमान १०५ कोटी रूपये पाण्यात गेले आहेत.

मागील पावसाळी अधिवेशनात गदारोळामुळे २१६ कोटी रूपये वाया गेल्याचे सरकारने सांगितले होते. यंदा २० कामकाजी दिवसांतील निम्मा कालावधी गोंधळातच खर्च झाला. लोकसभेत पूर्ण बहुमत असल्याने सरकारने काही कामकाज चालविले. पण राज्यसभेत विरोधकांचा आवाज बुलंद असल्याने कोरोनावरील चर्चा व गोंधळात घेतलेला १ प्रश्नोत्तराचा तास वगळता कामकाज झालेले नाही.

दरम्यान कांग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबद्दल जे उद्गार काढले ते विरोधकांवरच बॅकफायर झाले अशी चर्चा विरोधी खासदारांत होती. कॉँग्रेस नेत्यांच्या अशा बेभरवशीपणानेच आम्ही खर्गे यांच्या बैठकीत जात नाहीत, असे तृणमूलच्या एका नेत्याने सांगितले. महागाईच्या मुद्यावरून आम्ही संसद दणाणून सोडली, २४ खासदार निलंबित झाले आणि या चौधरी यांनी एका फटक्यात आमचे सारे प्रयत्न पाण्यात घातले अशी भावना विरोधकांत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या