25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयरागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली; पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ

रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली; पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाला हादरवणा-या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याने कोर्टासमोर आपला कबुलीनामा दिला आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे आफताबने कोर्टात कबुल केले आहे. दरम्यान, आरोपी आफताबची पोलिस कोठडी आज संपल्यामुळे त्याला दिल्लीतील साकेत कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी आफताबनं दिल्लीतील साकेत कोर्टात कबुली दिली. आफताबच्या पोलीस कोठडीच चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

साकेत कोर्टासमोर कबुली देताना आरोपी आफताब पूनावालाने न्यायालयात सांगितले की, घटना क्षणार्धातच घडली. तपासात सहकार्य करत असल्याचेही त्याने कोर्टाला सांगितले. तसेच पुढे बोलताना मला घडलेली घटना नीट आठवत नसल्याचंही त्यांनं कोर्टाला सांगितले. श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताब एखाद्या प्रोफेशनल किलरप्रमाणे पोलिसांची सतत दिशाभूल करत असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्याने तीन करवतीच्या ब्लेडचा वापर केला होता. त्यानंतर ते ब्लेड डीएलएफ, गुरुग्राम येथील त्याच्या कार्यालयाजवळ फेकून दिले होते. आफताबनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सलग दोन दिवस ब्लेड्सचा शोध घेतला. पण तिथे काहीच सापडले नाही. बुधवार दि. २३ नोव्हेंबर रोजी पोलीस पुन्हा एकदा शोधमोहीम राबवणार असून यावेळी पोलीस आफताफला सोबत घेऊन जाण्याची शक्यता आहे.

आफताबने यापूर्वी श्रद्धाच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रं जंगलात फेकल्याचे पोलिसांना सांगितले होते. श्रद्धाचे शीर कुठे आहे? पोलिसांच्या या प्रश्नाला उत्तर देतानाही त्याने अनेकदा आपला जबाब बदलला आहे. आज आफताबला व्हिडीओ कॉन्फरंिन्सगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याला १० दिवसांची कोठडी सुनावली होती. सूत्रांनी सांगितलं की, दिल्ली पोलीस पुन्हा एकदा गुरुग्रामच्या जंगलात शोध घेऊ शकतात. शस्त्रांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल १४ पथकं तयार केली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या