28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय लसीचा दुष्परिणाम; नुकसान भरपाई मिळणार

लसीचा दुष्परिणाम; नुकसान भरपाई मिळणार

एकमत ऑनलाईन

लंडन : जगभरात कोरोनावर युद्ध पातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत आहे. ब्रिटनने फायझरच्या लसीला मंजुरी दिली असून पुढील आठवड्यापासून लस देण्यास सुरुवात होणार आहे. याच दरम्यान आता ब्रिटन सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोना लसीमुळे एखाद्या व्यक्तीवर साईड इफेक्ट झाल्यास म्हणजेच त्याचे दुष्परिणाम जाणवल्यास सरकार त्या व्यक्तीला नुकसानभरपाई देणार आहे. ‘वॅक्सिन डॅमेज पेमेंट्स स्किम’ या योजनेअंतर्गत मदत केली जाणार आहे. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

मात्र कोरोना लसीमुळे काही साईड इफेक्ट झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर असणार, संबंधित व्यक्तिला नुकसान भरपाई कोण देणार, याबाबत चर्चा सुरू आहे. १९७९ मध्ये ‘वॅक्सिन डॅमेज पेमेंट्स स्किम’ची सुरुवात करण्यात आली. यामध्ये एखाद्या लसीमुळे साईड इफेक्ट झाल्यास सरकारकडून नुकसानभरपाई दिली जाते.

इन्फ्लुएझा, देवी, धनुर्वात आदी लसींचा समावेश करण्यात आला होता. तर २००९ मध्ये ‘एच१एन१’ च्या लसीचा समावेश करण्यात आला होता. इंग्लंडने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे.

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या