नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचसोबत, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनाही पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, १० जणांना पद्मभूषण, तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषण (मरणोत्तर), माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण, तर लोजपचे नेते रामविलास पासवान यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पद्मविभूषण पुरस्कार :
शिंजो आबे, जपानचे माजी पंतप्रधान
एस पी बालसुब्रह्मण्यम, गायक (मरणोत्तर)
डॉ. बेल्ले हेगडे, वैद्यकीय
नरिंदर सिंह कपनी, विज्ञान आणि अभियांत्रिकी (मरणोत्तर)
मौलाना वहिदुद्दीन खान, आध्यात्मिक
बी बी लाल, पुरातत्वशास्त्र
सुदर्शन शाहू, कला
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतरत्न पुरस्कारानंतरचे पद्म पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात. राजकारण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना केंद्र सरकारतर्फे गौरवण्यात येते. दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील ५९ व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील परमेश्वर बालाजी नागरगोजे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार अनिल दशरथ खुले आणि बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जाहीर झाला आहे.
देशातील ५२ तुरुंग अधिकारी व कर्मचा-यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. हवालदार उत्तम विश्वनाथ गावडे, संतोष बबला मंचेकर आणि बबन नामदेव खंदारे यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘सुधारात्मक सेवा पदक’जाहीर झाले. एका कर्मचा-याला मरणोत्तर सुधारात्मक शौर्य सेवा पदक जाहीर झाले आहे.
पोलीस पदकांचीही घोषणा झाली असून, राज्यातल्या ५७ पोलिसांना हा पुरस्कार झाला आहे. चार पोलीस अधिकाºयांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ ,१३ ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता ४० ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते.
हरिओम चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित