Thursday, September 28, 2023

सिसोदियांनी २ फोन केले नष्ट

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात, सीबीआयने आपल्या पुरवणी आरोपपत्रात मनीष सिसोदिया यांनी २ फोन नष्ट केल्याचा दावा केला आहे. २५ एप्रिल रोजी सीबीआयने राऊस एव्हेन्यू कोर्टात हे आरोपपत्र दाखल केले. शनिवारी न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेतली. मनीष सिसोदिया यांना न्यायालयात हजर करण्यासाठी न्यायालयाने तुरुंग प्राधिकरणाच्या नावाने प्रॉडक्शन वॉरंट जारी केले.

सिसोदिया यांच्याशिवाय सीए बुची बाबू गोरंटला, मद्यविक्रेते अर्जुन पांडे आणि अमनदीप धल्ल यांनाही समन्स पाठवण्यात आले आहेत. या सर्व आरोपींना २ जून रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. सीबीआयने पुरवणी आरोपपत्रात दावा केला आहे की, सिसोदिया यांनी त्यांचे दोन फोन नष्ट केल्याचीही कबुली दिली आहे. १ जानेवारी २०२० ते १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत सिसोदिया यांनी तीन मोबाईल हँडसेट वापरल्याचे तपासात समोर आले आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या