27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू

गंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

कानपूर : कानपूरच्या बिल्हौरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. अरौल येथील कोठी घाटावर गंगेत आंघोळ करताना सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. तर, एक तरुण आणि चार अल्पवयीन मुली गंगेत बुडाल्या आहेत.

सध्या पोलिसांनी बचावकार्य सुरू केले असून गंगा नदीत त्यांचा शोध सुरू आहे. घाटावर मोठ्या संख्येने लोक जमू लागले आहेत. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. शिवाय, आरोग्य विभागाच्या सहा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कानपूर नगरच्या पश्चिमेला सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या अरौल शहरातील बरांडा गावात राहणा-या संदीप कटियार यांनी मकानपूर रोडवर कपड्यांचे नवे दुकान सुरु केले आहे. रविवारी या दुकानाचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाला कटियार यांचे कानपूर आणि फारुखाबाद येथून नातेवाईक आले होते.

यावेळी नातेवाईकांसह मुले गंगा नदीत आंघोळीसाठी गेली असता ही दुर्घना घडली. यामध्ये अनुष्का उर्फ ​​दिव्या कुमार, बहीण अंशिका, मुलगा राम सिंह, फारुखाबादमधील रामबाबू, तनुष्का, अनुष्का, सृष्टी आणि गौरी यांच्यासह आठ ते दहा जण आंघोळीसाठी कोठी घाटावर गेले होते. यावेळी यातील सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी बुडालेल्यांचा शोध सुरू केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या