20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeराष्ट्रीयबसमध्ये दिवे लावून झोपले; ड्रायव्हर-क्लीनर जळून खाक

बसमध्ये दिवे लावून झोपले; ड्रायव्हर-क्लीनर जळून खाक

एकमत ऑनलाईन

रांची : देशभरात दिवाळी मोठया उत्साहात साजरी होत आहे. मात्र, ऐन सणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. रांचीमध्ये बसमध्ये झोपलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरची अखेरची दिवाळी ठरली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या रात्री बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर हे दोघे दिवे लावून झोपले होते. त्यामुळे रात्री अचानक बसला आग लागली. यामुळे दोघांचा होरपळून मृत्यू झाला. बसला आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली.

अग्निशमन दल पोहोचेपर्यंत बस जळून खाक झाली होती. पोलिसांनी बसमध्ये सापडलेल्या अर्धावस्थेत जळालेले दोन मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहेत. उद्धव ठाकरेंचा अभ्यास कमी, मदत कधी मिळते हे त्यांना माहिती नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या