27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeराष्ट्रीयस्वदेशी अ‍ॅस्ट्रोसॅटने टिपली लघु दीर्घिका

स्वदेशी अ‍ॅस्ट्रोसॅटने टिपली लघु दीर्घिका

एकमत ऑनलाईन

पुणे : भारताच्या पहिल्या अवकाश दुर्बिणीने अर्थात अ‍ॅस्ट्रोसॅटने एका लघु अथवा बटू दीर्घिकेची दुर्मिळ प्रकाशचित्र मिळविली आहे.

पृथ्वीपासून सुमारे १.५ ते ३.९ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील या दीर्घिकेत नवीन तारे बनण्याची प्रक्रिया सुरू असून, या अवस्थेतील हे पहिलेच संशोधन आहे.

आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या अंशुमन बोरगोहेन यांचा नेतृत्वातील या संशोधनात भारतासह अमेरिका आणि फ्रान्सच्या खगोलशास्त्रज्ञांचाही सहभाग आहे.

बोरगोहेन हे पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राचे (आयुका) प्रा. कनक साहा आणि तेजपूर विद्यापीठाचे डॉ. रुपज्योती गोगोई यांचे पीएच.डी. विद्यार्थी आहेत. नुकतेच नेचर या शोधपत्रिकेत हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या