नवी दिल्ली : धूम्रपान करण्यासाठीची वयोमर्यादा २१ वर्ष करण्याची मागणी करणारी याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली. ही याचिका जनजागृतीपेक्षा प्रचार करणारी अधिक असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले.
याचिकेत धूम्रपान करण्याचे वय १८ वरून २१ करावे, सुट्या सिगारेटची विक्री बंद करावी, अशी मागणी करण्यात आली होती. न्या. एस. के. कौल आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.