नवी दिल्ली : कथित बेकायदेशीर बार प्रकरणात स्मृती इराणी यांच्या मुलीचे नाव समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे.
या प्रकरणात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसुझा आणि काँग्रेस यांना त्यांच्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल नोटीस पाठवली आहे. तसेच कॉंग्रेस नेत्यांना लेखी बिनशर्त माफी मागावी आणि तात्काळ प्रभावाने आरोप मागे घ्यावा, असे म्हटले आहे.