23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयस्मृतीसाठी जीव झाला येडा पिसा..

स्मृतीसाठी जीव झाला येडा पिसा..

एकमत ऑनलाईन

रंगिरी डंबुला : भारतीय आणि श्रीलंकेच्या महिला संघामध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना आज रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळला गेला.

मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाची नजर हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यावर असला तरी श्रीलंकेच्या संघाची नजर आजचा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यावर असेल, पण दुस-या टी-२० सामन्यादरम्यान स्मृतीचा एक जबरा फॅन स्टेडियममध्ये आला होता.

या चाहत्याने त्यांच्या हातामध्ये एक पोस्टर आणले होते. या पोस्टरवर लिहिले होते की, माझ्याकडे पेट्रोल नाही तरीपण आलोय, स्मृती मानधनाला पाहायला. पोस्टरवर दोन हार्ट देखील आहे, स्मृतीच्या या चाहत्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या