25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रात येणा-या ट्रकमध्ये गायींची तस्करी? जमावाकडून एकाची हत्या

महाराष्ट्रात येणा-या ट्रकमध्ये गायींची तस्करी? जमावाकडून एकाची हत्या

एकमत ऑनलाईन

नर्मदापूरम : मध्य प्रदेशच्या नर्मदापूरम येथे एक भयानक घटना घडली आहे. गायींच्या तस्करीच्या संशयावरून जमावाने एकाची हत्या केली आहे. नर्मदापूर येथील एका गावातून गायींच्या तस्करीच्या हेतूने एक ट्रक महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात येणार होता.

विशेष म्हणजे जवळपास दोन डझनपेक्षा जास्त गायी या ट्रकमध्ये भरण्यातही आल्या होत्या. या गायींना अमरावती आणि नागपुरात आणले जाणार होते. पण त्याआधीच नर्मदापूरमधीलच आजूबाजूच्या गावातील नागरिकांना गायींची तस्करी केली जाणार आहे, गायींना कत्तलखान्यात घेऊन जाणार आहेत, अशी खबर लागली. त्यानंतर जमावाने रात्रीच्या सुमारास जाणा-या गायींच्या ट्रकला अडवले. ट्रकमध्ये खरंच गायी पाहून काहीजण संतापले. त्यांनी गाडीत असलेल्या तिघांना प्रचंड मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाने त्या तिघांना इतकी मारहाण केली की त्यापैकी एक जणाचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या अंधारात हा सगळा प्रकार समोर आला आहे.

संबंधित घटनेची माहिती समोर आली तेव्हा गायींच्या तस्करीच्या मुद्यावरून प्रचंड मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर जमावाने गायींची तस्करी करणा-या तीन जणांना बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली. संबंधित माहिती ही खरी ठरली आहे. कारण जमावाने मारहाण केलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित घटना ही सिवनीमालवा येथील बराखड गावाजवळ घडली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्या आणि गायींच्या तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि जिल्हाधिका-यांनी घटनास्थळाला भेट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, ट्रकचालकाने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी आपल्यासोबत नेमकं काय घडलं ते त्याने सविस्तर सांगितले. पण ट्रकचालकाने गायींच्या तस्करीसाठी आपण गायी घेऊन जात होतो असे विधान केलेले नाही. गायींना अमरावतीत बाजारात घेऊन जात होतो, असे सांगितले. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या