27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयम्हणून माझा छळ करण्यात आला - सीबीआयचे माजी संचालक आर. के. राघवन...

म्हणून माझा छळ करण्यात आला – सीबीआयचे माजी संचालक आर. के. राघवन यांचा खुलासा

एकमत ऑनलाईन

सुरत : गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांच्या विरोधकांकडून आपला छळ करण्यात आला असा आरोप सीबीआयचे माजी संचालक आर के राघवन यांनी केला आहे. आऱ के़ राघवन यांचे अ रोड वेल ट्रॅव्हल्ड आत्मचरित्र प्रकाशित झाले असून, यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. नरेंद्र मोदींविरोधात कोणताही पुरावा न आढळल्याने त्यांना क्लीन चीट देण्यात आली होती.

माझ्याविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांची बाजू घेण्यात आल्याचा आरोप झाला. माझ्या फोनवरील संभाषणांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. पण काहीही ठोस न मिळाल्याने त्यांची निराशा झाली, असे राघवन यांनी पुस्तकात म्हटले आहे.

दंगलीप्रकरणी ९ तास केली होती चौकशी
२००२ गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींची सलग नऊ तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान नरेंद्र मोदींनी तपास अधिका-यांकडून विचारण्यात आलेल्या १०० पैकी एकही प्रश्न टाळला नाही. संपूर्ण चौकशीदरम्यान ते अत्यंत शांत होते. नऊ तासांच्या या चौकशीत त्यांनी साधा चहादेखील स्वीकारला नाही, असा खुलासा राघवन यांनी केला आहे. तपासासाठी नरेंद्र मोदींना गांधीनगरमधील एसआयटी कार्यालयात येण्याची तयारी दर्शवली तसेच, सोबत पाण्याची बाटली आणली होती, अशी माहिती दिली आहे.

मोदींनी जनतेला लुटणे सोडावे – राहुल गांधी यांचा सल्ला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या