26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीय..तर पक्षावर वाईट परिस्थिती ओढवेल; ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सिब्बल यांचा सूचक इशारा

..तर पक्षावर वाईट परिस्थिती ओढवेल; ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सिब्बल यांचा सूचक इशारा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे उत्तर प्रदेशातील युवा नेते जितीन प्रसाद भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आणखी काही नेते भाजपमध्ये दाखल होतील, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी दुस-याचे ऐकल्याशिवाय कोणतीही व्यवस्था टिकू शकत नाही. राजकीय पक्षांचेही तसेच आहे. तुम्ही ऐकले नाही, तर तुमच्यावरही वाईट परिस्थिती ओढवेल, असा सूचक इशारा दिला आहे.

यावेळी सिब्बल यांनी मला खात्री आहे की, नेतृत्वाला हे माहिती आहे की नेमकी समस्या काय आहे. माझी आशा आहे की, नेतृत्व लोकांचे ऐकेल. कारण ऐकल्याशिवाय काहीही तग धरू शकत नाही. पक्षांतर्गत समस्यांचे निराकरण केले गेले नाही हे खरे आहे. या समस्यांची शक्य तितक्या लवकर दखल घेतली गेली पाहिजे. आम्ही सातत्याने या अडचणींविषयी सांगत राहू. काँग्रेसने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष व्हायला हवे. त्यासाठी आपल्याला पुनर्रचना करणे आवश्यक आहे. जर प्रमुखाने ऐकणेच सोडून दिले, तर संघटना कोसळेल. आम्हाला फक्त इतकेच हवे आहे की, पक्षाने आमचे ऐकावे, असे म्हटले.

यावेळी त्यांनी जितीन प्रसाद यांच्यावरही नाराजी व्यक्त केली. जितीन प्रसाद यांनी जे केले, त्याच्या विरुद्ध मी नाही. पण भाजपमध्ये प्रवेश करणे हे मी समजू शकत नाही. आपण आयाराम गयाराम राजकारणापासून आता ‘प्रसादा’च्या राजकारणाकडे वळू लागल्याचे हे प्रतिक आहे. जिथे प्रसाद मिळेल, तो पक्ष तुम्ही जवळ करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मी जीवंत असेपर्यंत भाजपमध्ये जाणार नाही
माझे म्हणाल, तर काँग्रेस पक्षाने मला सांगितले की आम्हाला तुमची गरज नाही, तर मी सोडून देईन. पण जिवंतपणी मी भाजपामध्ये जाणार नाही. माझ्या मरणानंतरच हे शक्य होऊ शकेल. माझ्या जन्मापासून मी भाजपला विरोध करत आलो आहे. जितीन प्रसाद यांच्या कृतीवर माझा म्हणूनच आक्षेप आहे, असे सिब्बल म्हणाले.

महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या